गंगापूरात शिवसेनेचा मेळावा उत्साहात ; पालकमंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती

Foto
जुने-नवे शिवसैनिक एकत्र एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

गंगापूर, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे शनिवारी मेळावा घेण्यात आला.

गंगापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला नाही. आता आगामी नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून भगवा फडकवावा असे पालकमंत्री संजय सिरसाठी यांनी आवाहन केले. या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व भागांतून जुने नवे शिवसैनिक मोठ्या संख्येने स्वयंप्रेरणेने दाखल झाले. संपूर्ण शहरात उत्साह आणि जोशाचे वातावरण पाहायला मिळाले. नुकतेच माजी आमदार कैलास पाटील व माजी आमदार अण्णासाहेब माने हे दोघांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर गंगापूर तालुक्यात आणि शहरात झालेला हा पहिलाच मोठा का महत्वर्यक्रम ठरला आहे. 

या मेळाव्याला जुने आणि नवीन शिवसैनिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, ठिकठिकाणहून कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या मेळाव्यात नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहादी यांनी आपल्या समर्थकांसह अरुण मंडप अॅण्ड सा. शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, विकास जैन, शिवसेनेचे युवा नेते संतोष माने, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दिलीप निरपळ, सचिन काकडे, गवंदे महाराज, अनिल चव्हाण, दिलीप राजपूत, संतोष काळवणे, लक्ष्मणसिंग राजपूत, माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहादी, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, अरुण रोडगे, ऋषिकेश पाटील, हरिभाऊ डव्हाण आणि कैलास साबणे यांची उपस्थिती होती.

पहिला मोठा कार्यक्रम : 
माजी आमदार कैलास पाटील या दोघांच्या प्रवेशानंतरचा गंगापूरात शिवसेनेचा (शिंदे गट) पहिला मोठा कार्यक्रम होता. विशेष म्हणजे, आमदार संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच गंगापूर शहरात आले. आणि त्यांच्या उपस्थितीतच शिवसेनेचा हा मेळावा पार पडला. कार्यक्रमात मंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडले. शहरात सर्वत्र शिवसेनेचे झेंडे, बॅनर आणि फेस्टूनने सजावट करण्यात आली होती.